Pimpri Vaccination News: शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारी ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा तर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार!
कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 20 जणांना, कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेल्या 80 दुसरा डोस या केंद्रांवर देण्यात येणार आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन, किऑस्क प्रणालीद्वारे ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर,महापालिका शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर,नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे, संत तुकारामनगर, पिंपरी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, प्रेमलोक पार्क दवाखाना, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड आणि सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत या 23 केंद्रांवर उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुसरा डोस दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, किऑस्क टोकन प्रणालीद्वारे हे लसीकरण करण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार!
कोविन अ‍ॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग केलेले, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, किऑस्क प्रणाली या पद्धतीने सावित्रीबाई फुले प्राथमिक स्कूल भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय आणि पिंपळेनिलख येथील इंगोले शाळेत ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.