Pimpri vaccination News : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण रविवारी बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे उद्या (रविवारी) बंद राहणार आहेत. त्यामुळेच उद्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार नाही. साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार असल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाने सांगितले आहे.

महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी ‘मी जबाबदार ॲप’वर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम आज नवीन जिजामाता रुग्णालयात राबविण्यात आली.

‘मी जबाबदार ॲप’वर नोंदणी केलेल्या 229 लाभार्थ्यांनापैकी प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर 64 लाभार्थी उपस्थित होते. यामधील 21 लाभार्थी अपात्र होते. पात्र 43 लाभार्थ्यांचे आज लसीकरण करण्यात आले आहे.

तसेच आज महापालिका भवनामध्ये महापालिकेमध्ये कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये 244 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. उद्या रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.