Pimpri Vaccination News: शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण रविवारी बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे उद्या (रविवारी) बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार असल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाने सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले. आजपर्यंत शहरातील 5 लाख 8 हजार 580 जणांनी लस घेतली आहे. उद्या सर्व केंद्रे बंद असणार आहेत. महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी आज लसीकरण मोहिम राबविली.

आवश्यक वैध पुराव्यानिशी ‘मी जबाबदार’ ॲपवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम नवीन जिजामाता रुग्णालयात राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये नोंदणी केलेल्या 216 लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर 101 लाभार्थी उपस्थित होते. यामधील 4 लाभार्थी अपात्र होते. पात्र 97 लाभार्थ्यांचे आज लसीकरण करण्यात आलेले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.