Pimpri Vaccination News : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस सोमवारी शहरातील या केंद्रावर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा तर ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा डोस 8 केंद्रावर दिला जाणार असून एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे. तर, कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस 28 केंद्रांवर दिला जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 28 दिवस झालेल्यांना देण्यात येणार आहे. तर, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84 ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

या आठ केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस !
यमुनानगर रुग्णालय,

तालेरा रुग्णालय,

सावित्रीबाई फुले शाळा भोसरी,

नवीन जिजामाता रुग्णालय,

आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी,

खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव,

नवीन आकुर्डी रुग्णालय आणि कासारवाडी दवाखाना या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचा दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस या 28 केंद्रांवर मिळणार लस !

इ.एस.आय.एस हॉस्पीटल मोहननगर, चिंचवड,

साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना,

रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (दिव्यांग नागरिकांकरिता),

घरकुल दवाखाना चिखली,

रुपीनगर शाळा तळवडे समाज मदीर शाळा,

प्राथमिक शाळा 92, मोरे वस्ती, म्हेत्रे बस्ती,

पिं.चिं. मनपा. शाळा नेहरनगर उर्दू शाळा,

म्हासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल,

नवीन भोसरी रुग्णालय,

पि. चिं. मनपा शाळा बोपखेल,

सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कूल,

मोशी दवाखाना,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय, दिघी (सी एस एम),

पंडित जवाहरलाल नेहर शाळा, च-होली,

पिंपळे गुरव माध्यमीक शाळा,

अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा,

कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा,

मंगलनगर थेरगाव,

83 पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ

पि. चिं. मनपा शाळा, पवनानगर, काळेवाडी,

भाटनगर दवाखाना,

अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर,

फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन,

मनपा शाळा किवळे,

बिजलीनगर दवाखाना,

बापुराव डवळे प्रायमरी स्कूल, पुनावळे,

प्रेमलोक पार्क दवाखाना,

मनपा शाळा, वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.