-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri Vaccination News : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस शनिवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, तर 30 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

30 ते 44 वर्षांपुढील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, जुने तालेरा रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी या केंद्रांवर 30 ते 44 वर्षांपुढील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा 200 च्या क्षमतेने पहिला डोस देण्यात येणार आहे.

45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, पिंपळेनिलख इंगोले शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे या 3 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे.

18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार !

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, कासारवाडी दवाखाना आणि नवीन भोसरी रुग्णालय रुग्णालयात 100 च्या क्षमतेने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 44 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 44 केंद्रांवर मिळणार !

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल फुलेनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा, एसएस अजमेरा स्कुल, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, निळू फुले नाट्यगृह सांगवी, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटनी,

फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 100 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.