Pimpri Vaccination News : ‘कोव्हॅक्सिन’, ‘कोविशिल्ड’ची लस गुरुवारी ‘या’ केंद्रावर मिळणार

18 वर्षांपुढील नागरिकांचे उद्या लसीकरण नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (गुरुवारी) ‘कोव्हॅक्सिन’ आणि ”कोविशिल्ड’ लशींचा डोस देण्यात येणार आहे. तर, 18 वर्षांपुढील नागरिकांचे उद्या लसीकरण होणार नाही.

‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, पिंपळेनिलख येथील इंगोले महापालिका शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक स्कुल भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस 100 च्या क्षमतेने मिळणार आहे. तर, पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.

तर, ज्या 45 वर्षांपुढील वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांना 8 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

कोविशिल्ड’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, कासारवाडी दवाखाना, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, प्रेमलोक पार्क दवाखाना आणि अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 45 वर्षांपुढील नागरिकांना 100 च्या क्षमतेने उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे.

कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या 10 टक्के आणि ‘ऑन द स्पॉट’ उपस्थितीत असलेल्या 90 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲपवर नोंदणीसाठी आज रात्री 8 नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.