Pimpri vaccination News: ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी 60 केंद्रांवर मिळणार  

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, हेडगेवार जलतरण तलाव,संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना,  आरटीटीसी सेंटर, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी,महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, किवळे, बिलजीनगर दवाखाना,  बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत,  प्रेमलोक पार्क दवाखाना, नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर,

महापालिका शाळा चिखली, महापालिका शाळा  जाधववाडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा,  महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती,  मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड,नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,  सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना,  छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,  सखुबाई गार्डन भोसरी, गंगोत्री पार्क दिघीरोड, भानसे स्कूल यमुनानगर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रूपीनगर,  नुतन शाळा ताम्हाणेवस्ती, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग,

कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग,  कांतिलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव,  महापालिका शाळा रहाटणी, दिनदयाल शाळा पवना बँक मागे संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,  गणेश इंग्लिश स्कूल दापोडी, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी आणि बालाजी लॉन्स नदी शेजारी जुनी सांगवी या 60 केंद्रांवर  कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले 5 लाभार्थी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले 20 लाभार्थ्यी आणि उर्वरित ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

या  ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 9 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,  आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.