Pimpri Vaccination News : शनिवारी नऊ केंद्रांवर ‘कोविशील्ड’ तर आठ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 25) नऊ केंद्रांवर ‘कोविशील्ड’ आणि आठ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लस मिळणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

खालील केंद्रांवर मिळेल कोविशील्ड लस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, वायसीएम रुग्णालयाजवळ आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी-चिंचवड मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा ग प्रभाग, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा या केंद्रांवर कोविशील्ड लस मिळेल.

या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 8 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांना शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त विदेशात जायचे आहे, अशा नागरिकांनी पुराव्यासह यावे. त्यांचे नवीन जिजामाता रुग्णालय येथे पहिला 100 डोस आणि दुसरा 100 डोस क्षमतेने लसीकरण होणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.