Pimpri Vaccination News : शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांनाच गुरुवारी मिळणार दुसरा डोस

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याने 18 ते 44 वयोगटामधील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनाच ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस उद्या (गुरुवारी) देण्यात येणार आहे. यासाठी पूर्ण क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन

पिंपरी-चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज 10 हजार 509 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.

फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड लसीचा’ दुसरा डोस   पूर्ण क्षमतेने लसीकरण सत्रे आयोजित करुन देण्याची कार्यवाही सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत सर्व लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे.

त्यामुळे वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.