Pimpri Vaccination News : शहरातील ‘या’ केंद्रांवर रविवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस उद्या (रविवारी) मिळणार आहे. तर, 8 केंद्रांवर गरोदर महिलांना लस देण्यात येणार आहे. उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!

सावित्रीबाई फुले प्राथमिक स्कुल भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 200 च्या क्षमतेने लस मिळणार आहे.

कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येणार आहेत.

45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार   

प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, ईएसआयएस हॉस्पिटल चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, निळु फुले नाट्यगृह सांगवी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या केद्रांवर 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला, दुसरा डोस 100 च्या क्षमतेने देण्यात येणार आहे.

ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येणार आहे.

गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 50 डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.