Pimpri Vaccination News : शहरात मंगळवारी 59 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर लस मिळणार!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, रुपीनगर ठाकरे शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवजेतनगर, यमुनानगर, शाळा ताम्हाणे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, नेहरुनगर उर्दु शाळा, महापालिका शाळा खराळवाडी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा चऱ्होली, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, निळु फुले नाट्यगृह, पिंपळेगुरव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या 34 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 140 जणांना, कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेल्या 10 जणांना पहिला डोस देण्यात येणार आहे. तर, कोविन अ‍ॅपद्वारे बुकिंग केलेल्या 5 आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 95 लाभार्थ्यांना दुसरा डोस या केंद्रांवर देण्यात येणार आहे.

45 वर्षापुढील नागरिकांना पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!
हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा जाधववाडी, महापालिका कन्या शाळा चिखली, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, जुने जिजामाता रुग्णालय, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, प्रेमलोक पार्क दवाखाना, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड आणि सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत या 26 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 45 वर्षांपुढील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिला, दुसरा डोस दिला जाणार असून कोविन अ‍ॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.