Pimpri Vaccination News : सोमवारी चार केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस

लस उपलब्ध नसल्याने सोमवारी 'कोविशील्ड'चे लसीकरण बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 19) लसीकरण सुरू आहे. शहरात सोमवारी 2 केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना तर 2 केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस मिळणार आहे.

सोमवारी ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2 कोविड 19 लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत मिळणार आहे.

कोविन अ‍ॅपवर बुकिंग केलेल्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरण केले जाईल. अ‍ॅपवर ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता स्लॉट बुकिंग ओपन होणार आहे.

खालील 2 केंद्रांवर 100 लाभार्थींच्या क्षमतेने 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा दुसरा डोस मिळेल –

# नवीन जिजामाता रुग्णालय
# फकिरभाई पानसरे उर्दू शाळा, चिंचवड स्टेशन

सोमवारी फक्त वय 45 वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॅक्सीन’चा फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) खालील 2 लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येणार आहे.

# सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
# पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिंपळे निलख दवाखान्याजवळ

वय 45 वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करून दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने करण्यात येईल.

वय 45 वर्षांपुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सोमवारी (दि. 5) सकाळी आठ वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

सोमवारी गरोदर महिलांचे लसीकरण सोमवारी बंद राहील. तर कोविशील्ड लस साठा उपलब्ध नसल्याने सोमवारी कोविशील्डचे लसीकरण बंद राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.