Pimpri corona Update : शहरात 163 नवीन रुग्णांची नोंद, 63 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 163 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 64 हजार 361 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 885 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 113 रुग्ण गृहविलगीकरणात असून 772 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 420 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 257 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 10 लाख 79 हजार 56 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.