Pimpri Vaccination News : ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा, तर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस उद्या ‘या’ केंद्रांवर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. उद्या (शनिवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस 8 केंद्रांवर देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येणार आहे. तर ‘कोव्हॅक्सिन’चा फक्त दुसरा डोस 4 केंद्रांवर दिला जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. ज्या नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84 ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

तर, कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या शनिवारी फक्त 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि कासारवाडी दवाखाना या आठ या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

तर, नवीन भोसरी रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी, यमुनानगर रुग्णालय आणि तालेरा रुग्णालय या चार केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे या वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.