Pimpri Vaccination News : ‘कोविशिल्ड’चा पहिला आणि दुसरा डोस शहरातील ‘या’ 65 केंद्रांवर शुक्रवारी मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस 65 केंद्रावर देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

या 65 केंद्रांवर मिळणार लस !

नवीन आकुर्डी रुग्णालय, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई आंब्रेला संभाजीनगर, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती,पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव,

पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, भाटनगर दवाखाना पिंपरी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे, नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, तालेरा रुग्णालय चिंचवड, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.