Pimpri Vaccination News : उद्या ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वय वर्ष 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला आणि दुसरा डोस उद्या (शनिवारी) देण्यात येणार आहे. 8 केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. पहिला आणि दुसरा डोससाठीची लाभार्थी क्षमता 100, 100 असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज 1885 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्ष 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना 15 मे 2021 पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने उद्या शनिवारी फक्त वय वर्षे 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘ कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस आठ लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत देण्यात येईल.

लसीकरण केंद्राचे नाव वयोगट पहिला डोस लाभार्थी क्षमता दुसरा डोस लाभार्थी क्षमता
(पहिला डोस घेतल्यानंतर 84 ते 112 दिवस झालेले लाभार्थी फक्त)

यमुनानगर रुग्णालय वय वर्ष 45 पुढील- 100, 100
तालेरा रुग्णालय वय वर्ष 45 पुढील – 100, 100
सावित्रीबाई फुले शाळा भोसरी वय वर्ष 45 पुढील – 100, 100
नवीन जिजामाता रुग्णालय वय वर्ष 45 पुढील – 100, 100
आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ वय वर्ष 45 पुढील – 100, 100
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव वय वर्ष 45 पुढील 100, 100
नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्ष 45 पुढील 100, 100
आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ वय वर्ष 45 पुढील 100, 100

वय वर्ष  18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.