Pimpri Vaccination News : ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस शनिवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय निगडी 1, प्रेमलोक पार्क दवाखाना, खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर, नवीन जिजामाता रुग्णालय, कासारवाडी दवाखाना आणि नवीन भोसरी रुग्णालय या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे.

18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार !

यमुनानगर रुग्णालय, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड येथे 100 च्या क्षमतेने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 53 केंद्रांवर 150 च्या क्षमतेने कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 54 केंद्रांवर मिळणार !

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, रोटरी क्लब सेंटर, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, रुपीनगर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, महापालिका शाळा खराळवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर सांगवी, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा रहाटनी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी,अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे,

फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, महापालिका शाळा किवळे, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 150 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment