Pimpri vaccination News : ‘कोव्हॅक्सिन’ची 6 आणि ‘कोविशिल्ड’ची 56 केंद्रांवर शुक्रवारी मिळणार लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस 3 केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव आणि अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी या 3 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे.

18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना या केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार!
नवीन भोसरी रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना आणि नवीन जिजामाता रुग्णालयात 100 च्या क्षमतेने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 56 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 56 केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, महापालिका शाळा खराळवाडी, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे,

नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 100 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.