Pimpri Vaccination News: किऑस्क, कोविन ॲप, ऑन द स्पॉटद्वारे नोंदणी केलेल्यांना शुक्रवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

एमपीसी न्यूज – चार दिवसानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली असून शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44 वयोगटातील ऑनलाईन, किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्यांना या केंद्रांवर लस मिळणार
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव आणि नवीन जिजामाता रुग्णालय येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

कोविन ॲपद्वारे बुकिंग केलेल्या 190 आणि किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे ‘या’ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

कोविन ॲपद्वारे नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे या केंद्रावर लसीकरण!
हेडगेवार जलतरण तलाव, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर ठाकरे शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल यमुनानगर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड,गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29, आठवडा बाजाराजवळ रावेत आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 24 केंद्रांवर कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. 200 लाभार्थ्यांपैकी 190 लाभार्थ्यांचे लसीकरण कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीद्वारे करण्यात येणार आहे.

तर, किऑस्क टोकन प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी आणि जुने तालेरा रुग्णालय येथे ऑनलाइन आणि किऑस्कद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण होणार आहे.

45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका कन्या शाळा चिखली, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, नेहरुनगर उर्दु शाळा, दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, गंगोत्री पार्क दिघी, कासारवाडी दवाखाना, पिंपळेनिलख इंगोले शाळा, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस या केंद्रांवर उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

कोविन ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग केलेल्या 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर आणि अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस !

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.