Pimpri Vaccination News : परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण आजपासून सुरु झाले आहे.

पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात लसीकरणाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य संदिप वाघेरे, नगरसेविका निकिता कदम, स्वीकृत सदस्य विनोद तापकिर, संदिप गाडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जिजामाता रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी उपस्थित होते.

 ‘मी जबाबदार’ ॲपवर नोंदणी आवश्यक

शहरामधील रहिवासी असलेल्या 18 ते 44 वयोगटातील उच्च शिक्षण्यासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. यासाठी परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले संबंधित परदेशी विद्यापीठाच्या विदेशी व्हिसासाठी प्रवेश पुष्टीकरण आणि आय-20 किंवा डीएस-160 फॉर्म आदी वैध पुरावे आवश्यक आहेत.

या लसीकरणाकरीता महापालिकेच्या ‘मी जबाबदार’ या ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचे महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाईल. मी जबाबदार या ॲपवर नोंदणी चालू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थींचे आठवड्यामधील दर शनिवारी लसीकरण करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.