Pimpri Vaccination News : शहरात सोमवारी लसीकरण सुरु; 57 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर दोन केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 21) लसीकरण सुरू आहे. शहरात सोमवारी 36 केंद्रांवर 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना तर 21 केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ‘कोविशील्ड’ लस मिळणार आहे. दोन केंद्रांवर ‘कोव्हॅक्सीन’ लस मिळणार आहे.

यासाठी केंद्रांवर सकाळी 9 वाजता टोकन वाटप सुरू होईल. दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.

सोमवारी ‘कोविशिल्ड’ लसीचा वय 30 ते 44 वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 36 कोविड 19 लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत मिळणार आहे. या वयोगटामधील कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या 50 टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा-या 50 टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सोमवारी ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा 45 वर्षापुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत देण्यात येणार आहे. या केंद्रावर 100 लाभार्थी क्षमता आहे.

सोमवारी ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थीना फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत देण्यात येणार आहे. या केंद्रावर 100 लाभार्थी क्षमता आहे.

सोमवारी फक्त वय 45 वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस (पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे 84 दिवसानंतर ते 112 दिवसपर्यंत) 21 लसीकरण केंद्रावर 100 लाभार्थीच्या क्षमतेने देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.