Pimpri Vaccination News : 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस गुरुवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार

Pimpri-Chinchwad Municipal Corporation

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (गुरुवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सीन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस शहरातील 51 केंद्रावर देण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सीन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्या 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना गुरुवारी 4 लसीकरण केंद्रावर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे. यमुनानगर रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा आणि नवीन जिजामाता रुग्णालयात लस मिळणार आहे.

तर, पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सीन’चा 8 केंद्रावर दुसरा डोस देण्यात येणार आहे. कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड या ठिकाणी ‘कोव्हॅक्सीन’चा दुसरा डोस मिळणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

या 51 केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ लस !

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई आंब्रेला संभाजीनगर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा, चिखली, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, महापालिका शाळा खराळवाडी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले मोशी दवाखाना,

छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.