Pimpri : एक लाख बालकांनी घेतला गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीचा लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे एक लाख तीन हजार बालकांनी गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 3 डिसेंबर 2018 अखेर 304 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

त्या अंतर्गत शहरातील 1 लाख 3 हजार 919 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.