Pimpri Vaccination : पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोविड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने 16 जानेवारी रोजी कोविड 19 च्या लसीकरणाला सुरुवात केली. तीन महिन्यात पालिकेने तीन लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत 3 लाख 3 हजार 349 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या 62 आणि खासगी 29 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. नोंदणीकृत आरोग्य सेवा देणारे, फ्रंट लाईन वर्कर आणि 45 वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे.

23 मार्च रोजी एक लाखाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर 6 एप्रिल रोजी दोन लाखांचा तर 17 एप्रिल रोजी तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण कारण्यात आले आहे.

आरोग्य सेवा देणाऱ्या 23 हजार 889 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 11 हजार 554 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंट लाईन वर्कर या गटातील 24 हजार 189 जणांनी पहिला तर 6 हजार 646 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 45 ते 60 वर्ष वयोगटातील 1 लाख 24 हजार 787 नागरिकांनी पहिला तर 2 लाख 843 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील 1 लाख 1 हजार 665 नागरिकांनी पहिला तर 28 हजार 819 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

एकूण 3 लाख 3 हजार 349 पैकी 2 लाख 74 हजार 530 जणांनी कोविड 19 लसीचा पहिला तर 28 हजार 819 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.