Pimpri vaccination News : ‘कोविशिल्ड’ची लस मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 30 ते 44 वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना दोन केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

30 ते 44 वर्षांपुढील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन भोसरी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, महापालिका कन्या शाळा जाधववाडी, घरकुल दवाखाना, चिखली, कन्या शाळा चिखली, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल तळवडे, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नेहरुनगर उर्दु शाळा,पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी,कासारवाडी दवाखाना, जुने तालेरा रुग्णालय, बिजलीनगर दवाखाना, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग,पिंपळेनिलख इंगोले शाळा या 38 केंद्रांवर 30 ते 44 वर्षांपुढील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा 200 च्या क्षमतेने पहिला डोस देण्यात येणार आहे.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 18 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 18 केंद्रांवर मिळणार !

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर,आरटीटीसी सेंटर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, महापालिका शाळा खराळवाडी, एसएस अजमेरा स्कुल, दीनदयाळ शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, महापालिका शाळा रहाटणी, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखाना, अश्विनी मेडिकल फाउंडेशन आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 100 च्या क्षमतेने दिला जाणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस या केंद्रांवर मिळणार !

कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना 100 च्या क्षमतेने दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना नवीन भोसरी रुग्णालयात 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.