Pimpri Vaccination News: पिंपरी-चिंचवड शहरातील ‘या’ केंद्रांवर बुधवारी ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) कोरोना प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. शहरातील 24 केंद्रांवर लस दिली जाणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस दिली जाणार आहे. 

महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

उद्या 45 पेक्षा जास्त वयोगटामधील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस या 24 केंद्रांवर मिळणार

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आकुर्डी रुग्णालय, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई आंब्रेला संभाजीनगर दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, रूपीनगर शाळा, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा जुने भोसरी रुग्णालयाजवळ, आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, महापालिका शाळा पिंपळेनिलख, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड (तालेरा रुग्णालय), महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, नवीन जिजामाता रुग्णालय, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, अहिल्याबाई होळकर सांगवी महापालिका शाळा, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, कासारवाडी दवाखाना या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.