BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘व्हॅलेंटाईन डे’ची धूम सुरू; भेटवस्तूंना अधिक पसंती

101
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठी बाजारपेठ सज्ज आहे, तर प्रेमाच्या या उत्सवासाठी तरुणाई आतूर आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ची धूम सुरू झाली आहे. माहौल व्हायला निमित्त आहे ते प्रेमाच्या दिवसाचे.. म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन्स डे’चे..

कॉलेजातील मुलांनी वेगवेगळे नियोजन सुरू केले आहे. बाजारपेठात प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल, डॉल, रोमँटिक संगीतावर नृत्य करणारे कपल्स आदी भेटवस्तूंना अधिक पसंती मिळत आहे. तसेच विविध प्रकारचे आणि आकारचे ग्रीटिंग कार्ड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. पाच रुपयांपासून पाच हजारापर्यंत या कार्डच्या किमती आहेत. रोमॅँटिक संगीत, इलेक्ट्रॉनिक भेटकार्ड आदींना तरुणाईकडून विशेष मागणी असल्याचे सुहास देशपांडे या विक्रेत्यांनी सांगितले.

  • प्रेमाचा हा उत्सव साजरा करण्यात कुठेही मागे नाही. शहरातील गिफ्ट शॉप असो की, केक शॉप, हॉटेल असो की, कॉफी शॉप. सर्वांवर चढला आहे तो प्रेमाच्या उत्सवाचा रंग.. लाल गुलाबी हार्टच्या आकाराचे फुगे, प्रेमसंदेश आणि प्रेमी युगुलांना आकर्षित करण्यासाठीच्या ऑफर्सनी प्रत्येक ठिकाण फुलून गेले आहे. प्रिय व्यक्तीला एखादी छानशी भेटवस्तू देसाठीही प्रेमवीरांची लगबग सुरू आहे. त्यामुळेच प्रेमीयुगुलांसह अनेकांची गिफ्ट शॉप्समध्ये गर्दी झाली आहे. कुणी ग्रिटिंगवरचा संदेश वाचण्यात दंग आहे तर, कुणी प्रेयसीसाठी नाजूकसे कानातले खरेदी करण्यात मग्न आहे.

हार्टचे गिफ्ट ४० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त ‘लव्हस्टोरी बुक & rsquo; आले आहेत. २०० ते हजार रुपयांपर्यंत हे बुक वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाइन डेसाठी सोशल नेटवर्किंग साइट्सवरदेखील युवक एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर दिवसभर व्हॅलेंटाइन डेचे मेसेज सेंड केले जात आहेत.हार्टमध्ये म्युझिकल हार्ट बिट, हार्ट किचन, हार्ट पेंडलसह इतर प्रकार आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.