Pimpri : वल्लभनगर बीआरटी बसस्थानक 30 दिवस बंद!

एमपीसी न्यूज – संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे प्रवेश आणि बाहेर पाडण्याचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वल्लभनगर बीआरटी बसस्थानक पाच मीटर पुण्याच्या दिशेने हलवण्यात येणार आहे. बीआरटी बसस्थानक पुढे हलविण्याचा कामासाठी 30 दिवस हे स्थानक बंद असणार आहे. दरम्यान, वल्लभनगर बीआरटी स्थानकाच्या समोरील बाजूला सर्व्हिस रोडवर हे स्थानक स्थलांतरित करण्यात आले आहे.

महामेट्रोकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. पिंपरी ते रेंजहिल दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे. वल्लभनगर येथे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. या स्थानकाचे प्रवेश आणि बाहेर पाडण्याचे मार्ग तयार करण्यासाठी वल्लभनगर बीआरटी बसस्थानक पुण्याच्या दिशेला पाच मीटर हलविण्यात येणार आहे. हे काम आज, मंगळवार (दि. 11) पासून सुरु झाले आहे. पुढील 30 दिवस हे काम चालणार आहे.

दरम्यान, वल्लभनगर बीआरटी बसस्थानक बंद राहणार आहे. पर्यायी बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. वल्लभनगर बीआरटी बस स्थानकाच्या समोरील बाजूला सर्व्हिस रोडवर हे बसस्थानक स्थलांतरित करण्यात आले आहे. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणा-या सर्व बस सर्व्हिस रोडवर थांबतील. या बदलाची नागरिकांनी दखल घ्यावी, असे आवाहन महामेट्रो कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.