Pimpri : सत्तेतील घराणेशाहीला थोपवण्यासाठी वंचित आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात

शिरुरमधून राहुल ओव्हाळ, मावळमधून राजाराम पाटील निवडणुकीच्या आखाड्यात

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षापासून मावळ, शिरुर मध्ये घराणेशाहीची सत्ता असल्यामुळे वंचित आघाडीला स्थान नव्हते. शिवसेना व भाजप युती, व राष्ट्रवादीला पर्याय म्हणून सत्तेतील घराणेशाहीच्या विरोधात वंचित विकास बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणुक लढवित आहेत.
आतापर्यत सत्ताधा-यांनी अनेक आश्वासने दिली पण त्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे समाज मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पर्याय म्हणून वंचित आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भारीप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देंवेद्र तायडे यांनी व्यक्त केला. पिंपरीत आज, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वंचित विकास आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील  हे मावळमधून तर शिरुरमधून राहूल ओव्हाळ हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मावळचे उमेदवार राजाराम पाटील म्हणाले,  ‘बहुजन समाज हा सत्तेचा केंद्रबिंदू बनला पाहिजे, यासाठी बहुजन समाजाने स्वतःचे नेतृत्व स्वतःच केले पाहिजे. गेल्या ७० वर्षापासून बहुजन समाजाने फक्त प्रस्थापितांना बहुसंख्येने मतदान केले व त्यांना सत्तेत बसविले, आता ह्यापुढे असे होवू न देता स्वतःचे नेतृत्व स्वतः करावे. समस्त बहुजन समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांना सत्तेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचिताचा प्रतिनिधी कोळी टोपी घालून निवडणुकीत दिसणर आहेत”
“मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे व पार्थ पवार यांच्या शर्यतीत आता वंचित  बहुजन विकास आघाडी उतरली आहे.  पार्थ पवार हे नवीन असून बारणे हे एकवेळ निवडून आले आहेत. पण मावळमधील कोणतेच प्रश्न त्यांनी सोडविले नाहीत.  ही निवडणुक आमची नसून प्रस्थापित घराणेशाहीची निवडणूक आहे” असे राजाराम पाटील म्हणाले. .
शिरुरचे उमेदवार राहुल ओव्हाळ म्हणाले, “लोकसभेत सगळ्या प्रश्नांची उकल झाली, पण कोळी व आगरी समाजाचा प्रश्न मांडला गेला नाही. लोकसभेत वंचित विकास आघाडीचे प्रश्न मांडण्यासाठी मत द्या. इथल्या राजकारणाच्या विरोधात जाण्यासाठी ही निवडणूक लढवित आहोत” वंचिताचे नेतृत्व करण्यासाठी वंचिताच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.