Pimpri : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे यांची सोमवारी ग्रंथतुला

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने आयोजन; विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ यांच्या शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने पिंपरीचे शिलेदार, पुस्तक प्रकाशक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला आणि शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा अर्थात मान्यवरांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सोमवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे. कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

  • पिंपरी-चिंचवड शहरात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ यांच्या शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने अभीष्टचिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शिलेदारांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. तसेच ‘पिंपरीचे शिलेदार’ या गौरव ग्रंथाचेही प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडमधून शेखर ओव्हाळ हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे त्यांनी आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. मात्र, त्यांचे सुपुत्र निहाल पानसरे यांनी ऐन लोकसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे असे मानले जाते कि, त्यांचे वडील देखील अर्थात पिंपरीचे शिलेदार आझमभाई पानसरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधून इच्छुक असलेले शेखर ओव्हाळ यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनवातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.