BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शहरात वटपौर्णिमेचा सण पोलीस बंदोबस्तात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस युक्तालय हद्दीत वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चेनचोरांवर करडी नजर ठेवली आहे. शहरात सर्व महत्वाच्या चौकांमध्ये, वडाच्या झाडांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे पोलीस बंदोबस्तात सण साजरा करण्यात येत आहे.

वाकड पोलिसांनी वडाच्या झाडांजवळ तसेच महत्वाच्या ठिकाणी महिलांना आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. दागिने व मौल्यवान वस्तू परिधान करून बाहेर जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

  • तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला आहे. वाघमोडे यांनी सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. महिला, तरुणी यांच्यासह पोलीस कर्मचा-यांना देखील अनुचित प्रकार घडू नये, याबाबत सूचना दिल्या.

वटपौर्णिमा हा महिलांचा हक्काचा सण आहे, असं म्हटलं जातं. वर्षातील सर्वच सण महिला-पुरुष या सगळ्यांचेच असतात. पण या सणाला महिला नटूनथटून वडाच्या झाडाला फे-या घेण्यासाठी जातात. यावेळी त्यांच्या अंगावर दागिने मोठ्या प्रमाणात असतात. याच संधीकडे काही चोरटे लक्ष ठेऊन असतात.

  • महिला वडाला फे-या मारण्यासाठी आल्या कि, चोरटे त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेतात. यामुळे मोठ्या उत्साहात घरातून निघालेल्या महिलांचा निरुत्साह होतो. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळते. यासाठी पोलीस ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवतात. पिंपरी-चिंचवड शहरात अशा घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3