Pimpri : वीणा सोनवलकर युवा मंचकडून राबविले मतदारांसाठी मदतकार्य

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विना सोनवलकर युवा मंचकडून उपक्रम आयोजित केले होते. यात मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आदींचा समावेश होता.

यावेळी नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि शस्त्रक्रिया झालेल्या नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी विशेष वाहनांची सोय करून पिकप ड्रॉपची सेवा देण्यात आली.

  • मतदारांना त्यांचे बूथ आणि मतदान केंद्र मतदान करण्याची खोली, अशी नागरिकांना मतदान करण्यासाठी याच केंद्रावर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्वांचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढायला मदत झाली. यावेळी विनोद पाटील, सुभाष फाटक यांच्यासह तांबे आदींनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.