Pimpri : वीर सावरकर योग परिवारतर्फे वारकर्‍यांची ‘मसाज’ सेवा

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र दत्त मंदिर पुगांव-रोहा (जिल्हा रायगड) येथून निघालेल्या अमृतानंदस्वामी शिष्यसांप्रदाय दिंडी सोहळ्याचे बुधवारी (दि. २०) भुमकर चौकातील चंद्रमाऊळी गार्डन वाकड येथे आली असता वीर सावरकर योग परिवाराचे संस्थापक योगगुरू रमेश मांडवकर यांचे मार्गदर्शनाखाली परिवारातील 45 योगसाधकांनी 500 वारकर्‍यांची मसाज सेवा करून भव्य स्वागत केले.

गेली 19 वर्षे हा दिंडी सोहळा अव्याहत सुरू आहे. या दिंडीत सोहळ्यात सर्व जाती-धर्मा बरोबर आदिवासी समाजाचे वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात या दिंडीत अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी, व्यसनमुक्ती यावर कीर्तन, प्रवचना द्वारे समाज प्रबोधन केले जाते.

या सेवेसाठी पल्लवी नारखेडे, माधुरी पाटील, वीणा अलगी, पल्लवी लोहार, शैलश्री वतारे, पुष्षा पाटील, विणा कांकरिया रेषमा मांडवकर ह्या महिला सेवेकरी तर पुरुष सेवेकरी सुरजु गुप्ता, पंकज भोसले,नरेद्रसिंह जमादार, संतोष मांडवकर, दत्तात्रय लोहार, दिपेश वलटे, रमेश भालेराव यांनी मसाज सेवा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.