Pimpri : संजय गांधी नगर परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील संजय गांधी नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्‍याने दहशत पसरवत सात ते आठ वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि.13) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील संजय गांधी नगर परिसरात सोमवारी रात्री दुचाकीवरून टोळके आले. आरडाओरडा तसेच दहशत पसरवत त्यांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. घटनेनंतर टोळके पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.