Pimpri : महाराष्ट्रात काँग्रेसला येणार अच्छे दिन

एमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची लाट ओसरत चाचली आहे. त्यामुळे खोट्या आश्वासनांचा फुगा फुटला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येण्याची मोठी संधी आहे.

केंद्र सरकारच्या सत्तेच्या केंद्रीकरणाचा हा परिणाम आहे. जनतेवर लादलेली नोटबंदी, मध्यम व्यापारी आणि छोटे उद्योगकर्त्यांसाठी आकारलेला जीएसटी, मध्यप्रदेशातील कथित व्यापम घोटाळा, आर्थिक सावटामध्ये सापडलेला देश अशी विदारक परिस्थिती आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. राज्य सरकारच्या चार-साडेचार वर्षाच्या काळात महाराष्ट्राचा शेतकरी फार हताश झाला आहे. अनेक अपेक्षा ठेवून जिंकून दिलेल्या सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही. सोयाबीन, कापसापासून ऊस, कांदा उत्पादकांची तर सरकारने थट्टाच केली आहे. सरकाराने जाहीरनाम्यातील गोष्टींची पूर्तता केली नाही. औद्योगिक क्षेत्राचा कोणताच नवीन प्रकल्प महाराष्ट्रात दिसत नाही. तरुणांना नोक-या नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर, मुस्लिम आरक्षणाचे काय? नोकरभरतीचे काय? दुष्काळ या सर्व प्रश्नांना समोर ठेवून भाजप सत्तेत आला होता. परंतु, त्यातील त्यातील आश्वासनांची पूर्तता करु शकले नाहीत.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अटळ आहे. काँग्रेस हा एक विचार आहे, हे सिद्ध झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची थट्टामस्करी करणारे भाजपचे नेते पराभवाचे चिंतन करताना दिसतील. महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश करुन निवडून आलेले अनेक खासदार, आमदार हे पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. भाजपने पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्या अनेक आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही. त्याची संख्या जास्त आहे. भाजपमधील गटबाजी, नाराज नेते आणि अवघ्या काही तासातच मध्यप्रदेश, राजस्थान सरकारने केलेली कर्जमाफी याचा सर्वांचा विघातक परिणाम राज्यातील भाजप सरकारला होईल. महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येतील यात शंका नाही.

गौरव चौधरी

(लेखक हे पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस प्रवक्ता आहेत)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.