Pimpri : ‘व्हायब्रंट एचआर’च्या पुरस्कारांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वितरण

एमपीसी न्यूज – ‘व्हायब्रण्ट एचआर’ ही औद्योगिक क्षेत्रात मानव संसाधन आणि प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संघटना असून (दि.१५) रोजी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केलेल्या लोकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रात मानव संसाधन आणि प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संघटना व्हायब्रण्ट एच आर या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत (दि.15) रोजी पिंपरी येथे पार पडला.

यावेळी सामाजिक भरीव कार्य केल्याबद्दल श्रीगौरी सावंत, लक्ष्मी अगरवाल,डॉ दिव्या गुप्ता यांना गौरवण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक कार्यासाठी निसर्ग सायकल मित्र, एच.आर. क्षेत्रात भरीव कार्यासाठी सतीश घोगरे व आशिष गकरे तर उमदे व्यक्तिमत्व म्हणून सुरेश कार्की व केतन कपूर बी यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यांत आले.

बेस्ट एच.आर. प्रॅक्टिसेस आणि व्हायब्रण्ट एच.आर. ऑलिम्पियाड २०१९-२० या विजेत्यांना यावेळी सन्मानपत्र बहाल करण्यात आली तसेच व्हायब्रण्ट एच.आर. व सानिया शंकर साळुंखे, शीतल विकास साळुंके आणि शंकर जगन्नाथ साळुंखे यांना पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करून बाल कामगार प्रथा निर्मूलन व इतर सामाजिक आणि पर्यावरणाविषयी प्रचार व प्रसारमाध्यमातून जनजागृती केल्याबद्दल विशेष सन्मान पत्र देण्यात आले.

यावेळी औद्योगिक क्षेत्रातील चालू घडामोडी त्यातील अडचणी आणि त्यामध्ये एच.आर.ची भूमिका याबद्दल मार्गदर्शन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.