Pimpri : निगडीमध्ये रविवारी व-हाडी बोली जागर साहित्य संमेलन

एमपीसी न्यूज – विदर्भ सहयोग मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. 14) व-हाडी बोली जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणातील विदर्भ भवन, सावरकर भवनजवळ रविवारी (दि. 14) एप्रिलला सकाळी साडे दहा वाजता या संमेलनाचे उदघाटन अकोल्याचे प्रा.डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते होणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लोककवी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विठ्ठल वाघ असणार आहेत. .यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्वामी विवेकानंदच्या संचालिका कविता भोंगाळे कडू पाटील, संत साई हायस्कूलचे संस्थापक प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, उद्योजिका अनुसया पल्हाडे, उद्योजक तुषार शेंगोकार, लीना हातेकर उपस्थित राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • दुस-या सत्रात दुपारी बारा वाजता कथाकथन होणार असून या त्यात प्रसिध्द व-हाडी कथाकार विजय पाटील, व-हाडी विनोदी कथाकार नरेंद्र इंगळे, व-हाडी कथाकार श्रीधर राजनकर आदींचा सहभाग असणर आहे.

तिसऱ्या सत्रात दुपारी तीन वाजता व-हाडी कवीसंमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व-हाडी कवी रामेश्वर ताठे असणार आहेत. यामध्ये राजा धर्माधिकारी, बी. गोपनारायण, दिनेश मोडोकार, विलास ठोसर, अनंत राऊत, अरविंद उन्हाळे, राजू चिमणकर, शाम ठक, पितांबर लोहार, हरिदास कोष्टी, नितीन वरणकार, देवेंद्र गावंडे, शांताराम हिवराळे, अजय धोटे आदी कवींचा सहभाग असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.