BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी विजय काळभोर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षपदी रो. विजय काळभोर यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून रो. प्रणिता आलूरकर यांच्याकडे पदभार देण्यात आला. मावळते अध्यक्ष रो. सुभाष जयसिंघानी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे काळभोर यांच्याकडे सोपवली.

रोटरी क्लब ऑफ निगडीचा पदग्रहण समारंभ निगडी येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रवी धोत्रे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशांत देशमुख, अविनाश भोंडवे, मारुतराव जाधव, मीना बोराटे, पद्मजा देशमुख, सतीश आचार्य, जितेंद्र शर्मा, सुदिन आपटे, तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीची 2019-20या आगामी वर्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून रो. जगमोहन सिंग, रो. प्रवीण घाणेगावकर, रो. हरबिंदर दुल्लत, रो. केशव मनगे, रो. सुहास ढमाले, रो. जयंत येवले, रो. सविता राजापूरकर, रो. डॉ. रवींद्र कदम, रो. राणू सिंघानिया, रो. अनिल कुलकर्णी, रो. मुकुंद मुळे, रो. किरण राखे, रो. प्रमोद देशमुख, रो. डॉ. शुभांगी कोठारी यांची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष रो. विजय काळभोर म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ निगडीच्या कामाचा झंझावात यापुढेही असाच सुरू राहणार आहे. सामाजिक समस्यांची जाण असणारा रोटरी क्लब पुढील काळात विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहे. पीडित, गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करण्यात येणार आहे.

प्रमुख पाहुणे रो. रवी धोत्रे यांनी रोटरी क्लब ऑफ निगडीने आजवर केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक क्षेत्रात काम करताना येणा-या अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत त्यांनी माहिती दिली.

सचिव रो. प्रणिता आलूरकर यांनी पुढील काळात रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने पुढील काळात राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी कोठारी यांनी केले. आभार किरण राखे यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3