Pimpri : विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी, एफसीआय संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा 

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीचा ५-३ असा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. एफसीआयच्या वैंकटेश देवकर याने दोन गोल तर, गुरफान शेख, आकाश पवार व अनुज सिंग यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

_MPC_DIR_MPU_II

एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीकडून (विनीत कांबळे याने दोन व विनोद नायर याने एक गोल केला. विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ संघाने ग्रीन मेडोज् संघाचे आव्हान ६-० असे परतावून लावत अंतिम चार संघामध्ये आपले नाव निश्‍चित केले. विजयी संघाकडून युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. स्पर्धेचा सविस्तर निकालः

उपांत्यपूर्व फेरीः फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः ५ (गुरफान शेख ३ मि., वैंकटेश देवकर १०, ५३ मि.; आकाश पवार १७ मि., अनुज सिंग ५० मि.) वि.वि. एक्सलन्सी अ‍ॅकॅडमीः ३ (विनीत कांबळे २३, ३२ मि., विनोद नायर ५८ मि.); हाफ टाईमः ३-१;विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अः ६ (युवराज वाल्मिकी १३, २०, ४७ मि., फिलीप बा ३४ मि.; देवेंद्र वाल्मिकी ३५ मि., रूबेन केदारी ३७ मि.) वि.वि. ग्रीन मेडोज्ः ०; हाफ टाईमः २-०;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.