Pimpri : विचारांच्या आदान-प्रदानाने साजरी झाली होळी

एमपीसी न्यूज –  विनायक भोंगाळे कृषी जल व पर्यावरण संवर्धन फाउंडेशन व सुपो प्रतिष्ठान तर्फे होळी महोत्सव आयोजन मंगळवार (दि.10) कासारवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी विचारांची देवाणघेवाण करत उत्साहात होळी साजरी करण्यात आली. सीएए व एनआरसी, वाचाल तर वाचाल तसेच रोजगार व जागतिक बाजारपेठ या विषयांवर खुली चर्चा यावेळी करण्यात आली.

 

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमाप्रसंगी निलेश म्हसये, ह.भ.प. वाघ व दिघी विकास मंच चे अध्यक्ष व सभासद यांनी आपले विचार व्यक्त केले. होळी व धुळवडी निमित्त स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रंगांबरोबरच विचारांची देवाणघेवाण करत उत्साहात व निसर्गमय वातावरणात होळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आयोजन समितीतर्फे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like