Pimpri: महापौर निवडणुकीत दगाफटका रोखण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रिंगणात, मोरवाडीत तातडीची बैठक

माजी मंत्री विनोद तावडे देखील बैठकीला हजर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वत: लक्ष घातले आहे. पाटील यांच्यासोबत भाजपच्या शहरातील कोअर कमिटीची मोरवाडीतील एका  हॉटेलमध्ये  बैठक सुरु आहे. या बैठकीला माजी मंत्री विनोद तावडे देखील हजर आहेत.

महापौरपदासाठी आज (सोमवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे आहेत. शहराचे महापौरपद पुढील अडीच वर्षाकरिता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे. राज्यात भाजपची सत्ता नाही. त्यामुळे नाराज नगरसेवक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत दगाफटका होऊ नये. यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातले आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पदाधिकारी निवडणुकीचे अर्ज दाखल करताना एकदाही मोठा नेता शहरात आला नव्हता. आता मात्र राज्यात सत्ता नसल्याने दगाफटका होण्याची भीती असल्याने भाजप प्रदेशाध्यक्षच रिंगणात उतरले आहेत.

महापौरपदासाठी सांगवीच्या माई ढोरे, थेरगावच्या माया बारणे, पिंपळेनिलखच्या आरती चोंधे, पिंपळेसौदागरच्या निर्मला कुटे, रावेतच्या संगीता भोंडवे यांच्यामध्ये चुरस आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.