Pimpri : लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नियमांचे उल्लंघन; 434 जणांविरोधात गुन्हे

Violation of rules on the first day of lockdown; Crimes against 434 people : 12 दुकानांविरोधात देखील कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी (दि.14) लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 434 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दाखल करण्यात आलेल्या 434 गुन्ह्यापैकीं 284 गुन्हे हे दुचाकीवरून डबल सीट जाणाऱ्यांविरोधात नोंदवण्यात आले आहेत. तसेच चारचाकीतून जाणाऱ्या 41, मास्क न घालणाऱ्या 55, तसेच विनाकारण पायी फिरणाऱ्या 27 गुन्ह्यांचा समावेश आहे.

तसेच दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या चार गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेहणाऱ्या 11 रिक्षा, तर बारा दुकानांविरोधात देखील कारवाई करण्यात आली आहे.

रावेत परिसरातून पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे.

लॉकडाउन दरम्यान फक्त दूध, औषधे, दवाखाने यांनाच सेवा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कंपन्यांना काम सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र व कंपनीने पुरवलेले प्रवास पास सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सेवेचा पास मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या [email protected] या ईमेल वर अर्ज करता येणार आहे.

तसेच ज्यांना पिंपरी चिंचवडच्या बाहेर प्रवास करायचा आहे त्यांना covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.