Pimpri: ‘सोशल डिस्टन्सिंग’ नियमाचे उल्लंघन; पिंपरी बाजारपेठ आज पासून 31 मेपर्यंत बंद

Violation of social distance; Pimpri market closed from May 27 to 31

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कॅम्पातील बाजारपेठीतील दुकाने, ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.  त्यासाठी पिंपरी बाजारपेठ आज पासून 31 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज रात्री उशिरा काढले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प मुख्य बाजारपेठ आहे. कॅम्पातील गर्दीवरील नियंत्रणासाठी महापालिकेने पत्रे टाकून रस्ते बंद केले होते. परंतु, निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होवू लागली.

खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने कॅम्पात येत आहेत.  नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे निर्दशनास आले आहे.

खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून  मास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखेच्या नियमाचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे कॅम्प परिसरात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

पिंपरीतील भाटनगर, बौध्दनगर, वैष्णदेवी माता मंदिर परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. या प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळील पिंपरी कॅम्प, शगुन चौक, कराची चौक, आर्य समाज चौक, साई चौक, गेलॉर्ड चौक, रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या बाजारपेठेतील दुकाने आणि ग्राहकांकडून अटी-शर्तीचे उल्लंघन होत होते.

त्यामुळे परिसरात कोरोनाच धोका निर्माण झाला होता.  त्यासाठी या परिसरातील बाजारपेठ आज 27 ते 31 मे पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.