Pimpri: ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन; अनधिकृत भाजी मंडईवर हातोडा

एमपीसी न्यूज – ‘सोशल डिस्टन्सिंग’चे उल्लंघन करणा-या पिंपरीतील अनधिकृत भाजी मंडईवर  महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (बुधवारी) हातोडा चालविला. भाजी मंडईतील गाड्यांवर कारवाई केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. फक्‍त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र ही खरेदी करतानाही तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र नागरिक सरकारने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

पिंपरीतील भाजीमंडईत आज सकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत भाजी मंडईवर धडक कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.