Pimpri : छावा मराठा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी विशाल राजगुरे यांची निवड

एमपीसी न्यूज – शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी छावा मराठा संघटनेची विद्यार्थी आघाडी स्थापन करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड छावा मराठा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी विशाल राजगुरे यांची निवड करण्यात आली आहे.

शिवाजीनगर विघार्थी आघाडी अध्यक्षपदी शुभम गवळी यांची नेमणूक करण्यात आली. तर विनायक तंबी यांची खडकी कॅन्टोन्मेंट विघार्थी आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे पुुणे जिल्हाध्यक्ष व कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव आणि नाशिक शहराध्यक्ष मयूर पांगारकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पुणे संपर्कप्रमुख सचिन गवांडे पाटील, दत्ता जाधव, ऍड. अमित चोपडे, .ऍड. अनिल दिघे, अनिरुद्ध शेलार, राजेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रामभाऊ जाधव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी छावा मराठा विद्यार्थी संघटना कार्यरत आहे. विद्यार्थ्यांवरील अन्याय, अत्याचार, शैक्षणिक भ्रष्टाचार, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, फी वाढ याविरूद्ध लढा देणे, हे संघटनेचे उद्दिष्ट आहे. मयूर पांगारकर यांनीही पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.