BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : बाल – कुमार साहित्य संमेलनाध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील

एमपीसी न्यूज- शब्दधन जीवन गौरव काव्यमंच पिंपरी-चिंचवड, आयोजित शब्दधन जीवन गौरव पहिले राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन येत्या 12 नोव्हेंबर रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण पवार, रामदास वाघमारे, दिगंबर शिंदे, प्रा.प्रशांत शेळके, हरिदास कोष्टी, दीपक अमोलिक, निरूपा बेंडे, राहुल इंगळे, सोमनाथ वाघ, उमेश कुंदे हे समन्वयक समिती सदस्य उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून उद्योजक अरुण पवार यांची निवड झाली असून, संमेलनाचे उद्घाटन ह.भ.प. शिवानंद स्वामी महाराज यांचे हस्ते करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, पुरस्कार व बक्षीस वितरण, बालनाट्य, नृत्य, शब्दाविष्कार,संमेलनाध्यक्षांशी बालकांचा मुक्त संवाद, कथाकथन, बालकांचे कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातून पालक, शिक्षक, साहित्यिकांसह जवळपास चारशे सहभागींची नोंद झाली असल्याची माहिती संमेलन प्रमुख समन्वयक प्रा. संपत गर्जे यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3