Pimpri: ताप येतोय? बरं वाटत नाही? आरोग्य विभागाच्या ‘या’ संकेतस्थळाला भेट देऊन घरबसल्या घ्या डॉक्टरांचा मोफत सल्ला

एमपीसी न्यूज – कोरोना आजारामुळे इतर आजार आणि समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच नागरिकांना योग्य वैद्यकीय सल्ला दिला जावा या उद्देशाने केंद्रीय आरोग्य विभागाने नागरिकांना नवीन संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिक ताप आणि इतर आजारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकणार आहेत.

कोरोना महामारीचा दिवसेंदिवस वाढणारा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.  प्रतिबंधक उपाय म्हणून विविध योजना राबवत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा इतर आजारांवर उपचार करण्यासाठी खासगी दवाखाने सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली असतानाही खाजगी दवाखाने कोरोनाच्या भीतीने दवाखाने बंद ठेवले जात आहेत, त्यामुळे नागरिकांना ताप व इतर आजारांच्या बाबत योग्य वैद्यकीय सल्ला उपलब्ध होत नाही आहे. यावर उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य विभागाने सर्वांसाठी मोफत वैद्यकीय सल्ला मिळावा या उद्देशाने ऑनलाइन ओपीडी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.

http://esanjeevaniopd.in या  संकेतस्थळाला भेट देऊन नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. या संकेतस्थळावर जाऊन पेशंट रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती तुमचा पेशंट आयडी आणि टोकन नंबर जनरेट झालेला एसएमएस येईल. तुमच्या मोबाईलवर उपलब्ध झालेल्या पेशंट आयडी आणि टोकन नंबरच्या मदतीने वेबसाईट वरती लॉगिन करून तुमचा नंबर येई पर्यंत वाट पहायची आहे. डॉक्टरांशी बोलणे झाल्यानंतर तुम्हाला ई- प्रिस्क्रिप्शन म्हणजेच केस पेपर डाउनलोड करता येणार आहे व त्याच्या मदतीने औषधे खरेदी करता येणार आहेत.

देशातील सर्व राज्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. आत्तापर्यंत या संकेतस्थळाच्या माध्यमातून दोन हजार पेक्षा जास्त लोकांनी वैद्यकीय सल्ला घेतला आहे. या संकेतस्थळावर चॅट आणि व्हिडिओ माध्यमातून सुद्धा सल्ला घेता येणार आहे. तेव्हा नागरिकांनी घाबरून न जाता या संकेतस्थळाच्या मध्यातून आवश्यक वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.