Pimpri : ‘ध्यासपर्व शांतीदूत’ चे आय.जी.ऑफिसर विठ्ठल जाधव निवृत्त; मान्यवरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – ध्यासपर्व शांतीदूत परिवाराचे आय.जी. ऑफिसर विठ्ठल जाधव निवृत्तीचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यांचा निवृत्तीपर सत्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अनाथांची माय सिंधु सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मातृसेवा संस्थेच्या संस्थापिता संस्कृती गोडसे, संस्थेचे संस्थापक सुहास गोडसे, निवृत्त विठ्ठल जाधव यांच्या पत्नी विद्या जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी अनाथांची माय सिंधु सपकाळ म्हणाल्या, गरिबीत लाजू नका. श्रीमंती आली तर माजू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात वाटेवर काटे असतात. तुमच्याही वाटेत आहेत. काट्यांशी मैत्री करा, काटे बोचले तरी सहन करा. संकटांवर मात करा आणि तुमच्याकडे येणाऱ्या सर्वांच्या दु:खावर प्रेमाने फुंकर घाला. प्रत्येकासाठी आईची माया ही एक श्रेष्ठ अनुभूती असते. पण, जगात अशीही काही अभागी मुले आहेत.

  • ज्यांना आईची माया मिळू शकत नाही. ज्यांच्या पाठीवर आईचा प्रेमळ हात कधी फिरत नाही. त्यांना कोणी चिऊ-माऊचा घास कोणी भरवत नाही. अशा 1000 पेक्षा जास्त अनाथ मुलांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत त्यांना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आईची माया देतात. त्याचे चांगले संगोपन, शिक्षण आणि चांगले संस्कार देत आहेत. त्यांच्या महान समाजकार्यामुळेच सिंधुताईंचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते.

संस्कृती गोडसे या शांतीदूत परिवाराच्या सदस्या आहेत. विठ्ठल जाधव आणि विद्या जाधव यांनी तिचे या कार्यक्रमात कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.