BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पामधील पाण्याची टाकी ‘ओव्हर फ्लो’, पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत असताना दुसरीकडे पिंपरी, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधील पाण्याची टाकी दररोज ‘ओव्हर फ्लो’ होत आहे. मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. अधिका-यांकडे तक्रार केली असता दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात लागू आहे. शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. असे असताना विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधील पाण्याच्या तीन टाक्या दररोज ‘ओव्हर फ्लो’ होत आहेत. पहाटे चार वाजता पाणी येते. तासाभरात पाण्याची टाकी भरते. त्यानंतर टाकी ‘ओव्हर फ्लो’ होऊन पाण्याची नासाडी होते.

मागील आठ दिवसांपासून पाण्याची टाकी ‘ओव्हर फ्लो’ होत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांकडे तक्रार केली असता. गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3