Pimpri: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनो स्वयंसेवक व्हा ! -आयुक्तांचे आवाहन

स्वयंसेवकांना मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संभाव्य वाढत्या फैलावाचा धोका लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. मात्र,  रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शहरातील तरूण आणि निरोगी नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून काम काम करावे, महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोना  विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्याचवेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशा बिकट परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यास आपल्याला अधिकाधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आम्ही  पिंपरी-चिंचवडमधील तरूण आणि निरोगी नागरिकांना या मदतकार्यामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आणि महापालिकेला सहाय्य करण्याचे आवाहन  केले आहे.

या उपक्रमामध्ये ज्यांना  सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांना  ”https://bit.ly/PCMCVOLUNTEER” या लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. या स्वयंसेवकांना ”कोविड-19” या  विषाणूपासून बचाव करण्यासंदर्भात  ऑनलाईन प्रशिक्षण  देण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.